Saturday, January 11, 2025

Latest Posts

गडकरी संतापले : त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन आत टाका

Nitin Gadkari in Bhandara News : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या एका tवक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत एका प्रकारे इशारा दिला आहे.ते म्हणाले  ‘नवीन कुठले कलम असल्यास ते लावा आणि या रस्त्यांच्या कामांमध्ये आडकाठी घालणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका’, असे थेट विधान गडकरी यांनी जाहीर सभेत केले आहे. (Gadkari Speech in pauni bhandara)

पवनी येथील ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने आनंद विद्यालयाच्या कोनशिला कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वन अधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त केला.

भंडारा ते पवनी या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन अनेक वर्षे झालीत. निधी मंजूर झालेला असतानाही केवळ वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या 12 वर्षांपासून रस्ता झालेला नाही. या कारणामुळे वना अधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठक घेतल्या. मात्र वन विभागाचे नियम रस्ता पूर्ण करण्यास आडकाठी करीत आहेत. त्यामुळे काम अपूर्ण आहे. भंडारा ते पवनी या रस्त्याचे बांधकाम अनेक प्रयत्नांनंतरही थांबलेल्याने गडकरी यांनी जाहीर भाषणतून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना भाषणादरम्यान विनंती करून आपण वैतागलो आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.

पोलिस अधीक्षकांना उद्देशून ते म्हणाले की, ‘नवीन कुठले कलम असल्यास ते लावा आणि या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका.’ या वक्तव्यातून गडकरी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

Latest Posts

Don't Miss