Saturday, January 18, 2025

Latest Posts

शनिवारपासून राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस

| TOR News Network |

Heavy Rain in Maharashatra : राज्यातील जनतेची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे. राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आज कोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यात पाऊस धो धो बरसणार आहे. (Rain in Maharashtra in next 2 days) मुंबईत सध्या काही भागात पाऊस सुरू आहे. (Today Rain in mumbai)

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. (cloudy weather in maharashtra) आता मान्सूनचं राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे. राज्यात मॉन्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.(Heavy rain in maharashtra) मुंबईत सध्या घाटकोपर ते मुलुंड दरम्यान पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 4 जून रोजी मोसमी पाऊस गोव्यात दाखल झाला. त्याने पुढची कुच सुरु केली आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तळकोकणात आज पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल. तर 10 जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांसह राज्यात पाऊस मांडव घालेल.(on 10 june rain in vidarbha) शनिवारपासून राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडेल. पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर राहणार आहे. (Vidarbha rain news) शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहे. राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. पावसाची सर्वांना प्रतिक्षा आहे. पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Latest Posts

Don't Miss