Sunday, January 12, 2025

Latest Posts

३२ वर्षे काँग्रेस पक्षात असलेला बडा नेता भाजपच्या वाटेवर

Ratnagiri Congress News : काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर आता भाजपाच्या वाटेवर आहेत अशी महिती समोर आलीये. (Prakash Mandavkar to jion bjp) सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करतील.विशेष म्हणजे ते गेल्या ३२ वर्षांपासून काँग्रेस मध्ये होते. (Prakash Mandavkar to left congress)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रकाश मांडवकर काँग्रेसला रामराम ठोकणार असून, रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ एप्रिलला ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (ravindra chavhan Prakash Mandavkar news) प्रकाश मांडवकर कुणबी सहकारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. राजापूर तालुक्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं मांडवकर यांनी स्वत: स्पष्ट केलंय.

राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असताना मांडवकरांच्या या निर्णयाचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. गेली ३२ वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुकयाच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रकाश मांडवकर अग्रेसर राहिले आहेत. (Prakash Mandavkar a leader in politics and social affairs)

माजी मंत्री आणि कुणबी समाजाचे दिवंगत नेते भाईसाहेब हातणकर यांचे मांडवकर हे खंदे समर्थक राहिलेत. काही काळ मांडवकरांनी भाईसाहेब यांचे स्वीय सहाययक म्हणुनही काम पाहिले होते. आपल्या तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून धडाडीचे कार्यकर्ते अशी प्रतिमा निर्माण केली. आता देखील तालुक्याच्या विकासासाठीच आपण भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (He said joining BJP only for development)

Latest Posts

Don't Miss