Thursday, January 16, 2025

Latest Posts

अल्पवयीन मुलांच्या मित्रांची पालकांसमोरच होणार पोलीस चौकशी

| TOR News Network |

Pune Porsche Car Accident Latest Update : पुणे अपघात प्रकरणात पोलीसांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.(Police in action on Porsche Car Accident Case) या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर आता याच गाडीत उपस्थित असलेल्या  मित्रांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. या दोन्ही मित्रांना पालकांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं आहे. (Police will take Inquiry on accused friends)

ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी गाडीत अल्पवयीन मुलगा त्याचा ड्रायव्हर आणि दोन मित्र होते. पार्टी करुन तिघेरी परत येत होते. या प्रकरणात समोर आलेले काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते तिघेही पार्टी करताना दिसत आहेत आणि मद्यप्रशान करतानादेखील दिसत आहेत. आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा त्याच्या गाडीतील मित्रांची चौकशी का करण्यात आली नाही,(Why the friends in the car were not questioned) ते दोघेही कुठे आहेत आणि त्यादोघांनाही का सोडण्यात आलं?, असे अनेक प्रश्न विचारले जात होते. या दोघांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे आणि या दोन्ही मित्रांना चौकशी करण्यात येणार आहे. (Both friends will be interrogated in Porsche Car case)

पुणे रॅश  ड्रायव्हिंग प्रकरणी आता पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे.(Pune police will also be investigated) पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. पोलीस आयुक्तांच्या मार्फत नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल दोन-दोन एफआयआरची नोंदणी का करण्यात आली यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी नेमकी कधी झाली सोयाबीनचा तपास या पथकाच्या माध्यमातून केला जाईल.

या प्रकरणात अल्पवयीन मुलाला 15 तासात जामीन मंजूर केल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाला राजकीय वळण आलं होतं. अनेक विरोधकांकडून आरोप करण्यात आले. या मुलाला कोण वाचवतंय?,(Who is saving the boys) याची चौकशी व्हायला हवी, अशा मागण्या करण्यात आल्या. संजय राऊत, रवींद्र धंगेकर पासून तर थेट राहुल गांधींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उडवली अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुण्यात हजेरी लावून वरिष्ठा पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली आणि पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.

Latest Posts

Don't Miss