Saturday, January 11, 2025

Latest Posts

यवतमाळ जवळील भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

| TOR News Network |

Yavatmal Accident Latest News : पंजाबवरून नांदेडला जात असताना एका इनोव्हा कारने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला.(4 Died in Yavatmal accident) ही घटना सोम(ता एक) यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडली आहे . (Yavatmal Kalamb innova Accident) यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते .

पंजाबमधून नांदेड येथे काही भाविक गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोव्हा कारने निघाले होते. (Four Punjab People Died in Kalamb Accident) नागपूर- तुळजापूर या महामार्गावर कळंब जवळ या इनोव्हा कारने ट्रकला धडक दिली. सोमवारी सकाळची पावणेसहाची घटना असल्याचे सांगितले जाते. अपघात इतका भीषण होता की इनोव्हा गाडी ही अक्षरश: ट्रकच्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या एअर बॅग्स च्या सुद्धा चिंधड्या झाल्या.(Innova Hit Back to truck at kalamb) कळंबच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत 2 पुरुष आणि 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. (4 died on spot in yavatmal accident) मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले . इनोव्हा कार मधील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती केले आहे . घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि तत्काळ मदतकार्य सुरु केले.  भाविक पंजाबमधून आले आहेत . ट्रक आणि इनोव्हा कार या एकाच दिशेने यवतमाळकडे चालल्या होत्या . इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली. रात्रभर प्रवास केल्याने ड्रायव्हरला झोप लागली असून त्यातून हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss