Thursday, January 16, 2025

Latest Posts

आकडा वाढला : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत अणखी ४ मृतदेह आढळले

Theonlinereporter.com – May 15, 2024 

Ghatkopar Hoarding Collapse Case Updates: मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगर परिसरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली होती. या घटनेत काल पर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला होता. अजूनही बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान आज बुधवारी सकाळी अजून चार मृतदेह ढिगाऱ्यातून काढले आहेत. (Four more bodies pulled out from Ghatkopar hoarding) त्यांची नावे अजून समजलेली नाहीत. त्यामुळे या दुर्घटनेत मृतांची संख्या आता १८ वर गेली आहे. (Death figure raised in ghatkopar case) सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना पेट्रोल पंपाला आग ही लागली. मात्र आगेवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आले. (Fire at ghatkopar petrol pump)

बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप होती. परंतु दहा मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले.(Fire under cantrol in ghatkopar case) आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. दरम्यान घाटकोपर होर्डिंग्ज खालून अजून चार मृतदेह ढिगाऱ्यातून काढले आहेत.आता मृतकांचा आकडा १८ वर गेला आहे.(Death figure went to 18 in ghatkopar case)

घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला आता ४० तास झाले आहेत. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकले आहेत. त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरु आहे.  पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचावकार्यातील पथक काम करत आहे. परंतु बुधवारी सकाळी पेट्रोल पंपाला आग लागली. (petrol pump caught fire in ghatkopar hoarding case) मोठे लोखंड कटरने कापात असताना आग लागली. आगीची घटना घडताच प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

आगीनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील लोकांनाही हटवण्यात आला आहे. पेट्रोल पंपाला लागलेल्या आगीमुळे ही काळजी घेण्यात आली आहे. सुदैवाने काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. 65 अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान, (Ndrf team in rescue operation at ghatkopar) 20 मशीनद्वारे मलबा हटवण्यासाठी काम करत आहेत. मलब्याखाली दबलेल्या वाहनांना काढण्यात आले आहे. आणखी काही वाहने दबल्याचा अंदाज आहे. ते काढण्याच काम सुरु आहे. आतापर्यंत 89 जणांना रेस्कीयू करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss