| TOR News Network |
Jalgaon Car Accident News : पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दुचाकीवर असणाऱ्या दोन जणांना उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.हे प्रकरण ताजे असताना आता जळगाव जिल्ह्यात ७ मे रोजी झालेला अपघात चर्चेत आला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होतो.(Four killed in jalgaon car accident) या प्रकरणात आरोपींना अजूनही अटक झालेली नाही. (no arrest in jalgaon car accident) चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही या घटनेतील आरोपींना अटक होत असल्याने राजकीय दबाव असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला होता. (political pressure in jalgaon car accident)
पुण्याच्या आणि जळगावच्या घटनेचा विचार केला तर दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आहे. मात्र आपण जळगावच्या अपघातानंतर सर्वात आधी ३०४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे एका आरोपीला लोकांकडून जास्त मार लागला.(people beat driver in jalgaon car accident) त्यानंतर उपचाराची आवश्यकता असल्यामुळे मेडिकल फिटनेस नसल्यामुळे अटक करता येत नाही. (Medically not fit so no arrest) त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, दोषींवर कारवाई करावी असे आदेश आपण पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत त्याचा अहवाल लवकर येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी मला दिला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.(Gulabrao patil on jalgaon accident)
आरोपी माझे नातेवाईक नाही. मात्र ज्या चार जणांचा मृत्यू झाला ते माझ्या मतदारसंघातले आहेत. त्यामुळे या प्रकरणात शेवटपर्यंत मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न करत राहणार आहे. वैद्यकीय कारणामुळे आरोपींना अटक करता येत नव्हती. मात्र तरीसुद्धा आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत आदेश मी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत,असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. (order given to arrest the accuse)