Thursday, January 16, 2025

Latest Posts

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा ‘या’ पक्षात प्रवेश फायनल

| TOR News Network |

Sanjay Pandey Latest News :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आता राजकारणात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Former police Commissioner sanjay pandey to join politics)हाऊ घातलेली विधानसभा निवडणूक बघता त्यांनी आपला पक्ष प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.(sanjay pandey to contest election vorsova)

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राजकीय इनिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.(Sanjay Pandey political journey to start) राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.(Sanjay pandey to join congress) आज संध्याकाळी 4 च्या सुमारास संजय पांडे हे काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. संजय पांडे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडेल.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आले होते. संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास 8 वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करुन या कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता.

Latest Posts

Don't Miss