Monday, January 13, 2025

Latest Posts

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात अनिल देशमुखांची धक्कादायक माहिती

| TOR News Network |

Anil Deshmukh Latest News : पुणे येथील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. (Anil Deshmukh Shocking information) त्यांनी या प्रकरणी एक्स मीडियावर पोस्ट करुन  एक मोठा आरोप केले आहेत. (Anil Deshmukh on Pune car Accident) त्यामुळे आता परत या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी कल्याणीनगर अपघाताबाबत गुरुवारी सकाळी एक्स मीडियावर पोस्ट केली.(Anil Deshmukh on Pune porsche Car Accident) त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले.(Blood Sample changed) हे उघड झालं आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या व्हिससेरा रिपोर्टमध्ये अल्कोहल पॉझिटिव्ह यावे, याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.(Viscera Report of victims) त्यामुळे मृत झालेले मोटरसायकलवरील तरुण-तरुणी हे दारु पिऊन होते. त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, असे सध्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम 25 जूनपर्यंत बालनिरीक्षक गृहातच असणार आहे. (Child Inspector Home) बुधवार बालन्याय हक्क मंडळात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्या अल्पवयीन मुलाला 25 जूनपर्यंत बालनिरीक्षक गृहातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Accused in child Inspector home till 25 june)कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचं बाल सुधारगृहाचा मुक्काम बुधवारी संपला. त्याला बालन्याय हक्क मंडळात हजर करण्यात आलं होत. यावेळी झालेल्या सुनावणीत 25 जुनपर्यंत त्या अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss