Sunday, January 12, 2025

Latest Posts

सगेसोयरे अध्यादेशासाठी तरुणाची आत्महत्या

| TOR News Network | Maratha Reservation Latest News : परत एकदा एका मराठा युवकाने अपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून आत्महत्या केली आहे.राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या सगेसोयरे अध्यादेशची अजून (Parbhani) अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलत  झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. (Maratha youth hang himself in jintur) ही घटना  जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा (Waghi dhanora) येथे घडली आहे. (Youth from jintur suicide for sagesoyre maratha reservation)

मराठा आंदोलनात होता सक्रिय सहभाग

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील वैभव लिंबाजीराव बोराडे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.(Vaibhav borade jintur suicide) वैभव बोराडे हा युवक मराठा समाजाच्या आरक्षण (Maratha Aarkshan) आंदोलनात सक्रिय सहभागी होता. यामुळे आपल्या समजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करत असे. यातच राज्य सरकारकडून सगे- सोयरे कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी होती. मात्र राज्य सरकारकडून यास विलंब होत असल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.(Maratha youth suicide in jintur)

सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने होत (Maratha Reservation) नसल्याने आपण स्वतःचे जीवन संपवत असल्याचे हाता-पायावर लिहून वैभव याने शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनी प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार वसंत वाघमारे, सुनीलकुमार वासलवार,अमलदार शेख जीलानी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

Latest Posts

Don't Miss