Saturday, January 11, 2025

Latest Posts

नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात पुष्पोत्सव

| TOR News Network | | Flower Festival at Lata Mangeshkar Park in Nagpur |नागपूर. नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे ‘पुष्पोत्सवा’चे आयोजन करण्यात आलेले आहे. वर्धमान नगर येथील लता मंगेशकर उद्यान येथे रविवार ११ फेब्रुवारी ते बुधवार १४ फेब्रुवारीपर्यंत पुष्पोत्सव राहिल. रविवारी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

नागपूर शहरातील जनतेमध्ये फुले व उद्यानाबाबत जागृती आणि आकर्षण वाढविण्याच्या अनुषंगाने मनपा उद्यान विभागाद्वारे पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पुष्पोत्सवामध्ये विभिन्न प्रजातींची फुले एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळणार आहेत. याशिवाय या फुलांच्या संदर्भात सविस्तर माहिती देखील तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान या पुष्पोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss