Saturday, January 18, 2025

Latest Posts

50000000 रुपयांची कॅश पकडली, राऊत म्हणाले काय बापू ..किती हे खोके

| TOR News Network |

Five Crore Cash Siezed From Car:  सोमवारी रात्री खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ एका कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.(5 crore cash siezed) ही रक्कम सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.(Sanjay raut on 5 cr cash siezed)

पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर जवळपास 5 कोटी रुपयांची रोख रक्कम तपास यंत्रणांच्या हाती आली आहे. कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोख रक्कम पकडण्यात आली आहे. (5 cr cash siezed from innova car) पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या या पैशांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्री ही रोख रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर ही रक्कम मोजायचं काम पहाटे चार वाजेपर्यंत. हे पैसे कोणाच्या मालकीचे आहेत? कुठे नेले जात होते? कोणाकडे पाठवले जात होते याची चौकशी सुरू आहे.

संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या कारवाईच्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड-शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटी सापडले! (प्रत्यक्षात 5 कोटी रुपये) हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले.(Cm Shinde giving 75 cr to every mla says sanjay raut) 15 कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू… किती हे खोके?” अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे.

यावर शहाजीबापू पाटील म्हणालेत (MLA Shahaji Bapu Patil First reaction )“मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी काल दिवसभर खेड्या-पाड्यात फिरत लोकांशी संपर्क साधत होतो. रात्री १० वाजता मला ही बातमी टीव्हीवर दिसली”, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

Latest Posts

Don't Miss