Thursday, January 16, 2025

Latest Posts

मालेगाव हादरलं : रविवारी मध्यरात्री माजी महापौरांवर झाडल्या 3 गोळ्या

| TOR News Network |

Malegaon Latest Crime News : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात चिंता निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. एकीकडे पुण्याचा अपघात गाजत असताना रविवारी मध्यरात्री नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये गोळीबाराचा थरार रंगला. (Midnight Firing in Malegaon) मालेगाव शहराच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला. (Firing on Former Mayor in Malegaon) अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा गंभीर जखमी झाले आहेत.

एएमआयएमचेचे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर रविवारी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला.अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. या हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहे. (In Attack Abdul malik Seriously injured) त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मलिक यांच्यावर हल्ल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घटना घडली.  अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला.(Midnight Attack at Malageon Former Mayor) एएमआयएच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगाव शहरात मोठ्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.आरोपींना सकाळपर्यंत अटक करण्याची मागणी एएमआयएमकडून करण्यात आली. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याची टीका मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पथके रवाना केली आहेत. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ माजली आहे.

मालेगाव तालुक्यातील झोडगे भागात अज्ञातांनी गोळीबार केला. दोन तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘मालकाला सांग 20 पेटी पाठव अन्यथा बघून घेऊ’ अशी धमकी देत त्यांनी हावेत गोळ्या चालवल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Firing Accused caught in CCTV) हल्लेखोर दुचाकीवर आले होते. पंपावर काम करत असलेल्या इसमाचा मोबाईल हिसकावून त्यांनी पोबारा केला.

Latest Posts

Don't Miss