Thursday, January 16, 2025

Latest Posts

अखेर जयदीप आपटेला अटक,घरातल्या व्यक्तीनेच पोलिसांना दिली टीप

| TOR News Network |

Jaydeep Apte Latest News :  छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्याचा मूर्तीकार जयदीप आपटेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.तो 26 ऑगस्ट पासून फरार होता. (Police Arrested jaydeep apte) कल्याण पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला कल्याणमधील घरातून अटक केली. (Jaydeep Apte Arrested from home) महाराष्ट्र पोलिसांच्या सात तुकड्या मागील काही दिवसांपासून जयदीप आपटेच्या मागावर होत्या. रात्री उशीरा जयदीप आपटेला अटक केल्यानंतर त्याला पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामधील कोठडीत ठेवण्यात आले.

एका वृत्तानुसार, जयदीप आपटेला अटक होण्यामागे त्याच्या पत्नीची भूमिका महत्त्वाची ठरली. जयदीप आपटेच्या पत्नीनेच तो येणार असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचं सांगितलं जात आहे.(Jaydeep’s wife gave tip to police) दुसरीकडे जयदीपचे नातेवाईक आणि मित्रही त्याला आत्मसमर्पण करण्याचा सल्ला देत होते अशी माहिती समोर येत आहे. जयदीप आपटेला बुधवारी पोलिसांनी त्याच्या कल्याणच्या घराबाहेरच अटक केली. जयदीप आपटे त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता. जयदीप त्याच्या पत्नीच्या संपर्कात होता.(Jaydeep was touch with her wife) त्याने तिला फोन करुन आपण घरी येत असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप चिंतेत होता. आत्मसमर्पण करण्याच्या तयारीनेच तो घरच्यांशी चर्चा करायला आलेला. तपासामध्ये सहकार्य करण्याची आपली इच्छा असल्याचं त्याने म्हटलं होतं.

जयदीप आपटेला ज्या घरातून अटक केली त्याच घरी जाऊन पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी केली होती. पोलिसांनी यावेळी जयदीपच्या आईची आणि पत्नीची चौकशी केली होती. जयदीप आपटेचे काही नातेवाईक शहापूरमध्ये राहतात. त्यामुळे पोलिसांनी तिथेही जाऊनही पोलिसांनी चौकशी केली होती. 4 सप्टेंबर रोजी रात्री अंधाराचा फायदा घेऊन जयदीप आपटे कल्याणमधील घरी आला.  पोलिसांची नजर चुकवून आपण आई आणि पत्नीची भेट घेऊन आत्मसमर्पण करण्यासंदर्भात चर्चा करुन पुढील निर्णय घ्यावा असा जयदीपचा मानस होता.(jaideep likely to surrender to police) जयदीप भेटीला येणार आणि आत्मसमर्पण करणार हे आधीच ठरलं होतं असा दावा त्याचे वकील गणेश सोवणे यांनी केली आहे. अटक केल्यानंतर जयदीपला सिंधुदुर्ग क्राइम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss