Sunday, January 12, 2025

Latest Posts

आता फिल्मफेअर अवार्ड ही गुजरातला पळवला

मुंबईला कमजोर करण्याचा प्रयत्न – जयंत पाटील

Filmfare Awards 2024 In Gujarat : बॉलिवूड विश्वातील सर्वांत मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गिफ्ट सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २८ जानेवारीला गुजरात टुरिजमच्या सहाय्याने गुजरात येथे होणार आहे. (Filmfare Award 2024 Will Not Held In Mumbai) हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित केला जायचा. मात्र, आता गुजरातमध्ये आयोजित करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. (Jayant patil post on flimfare award)

“मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा!” , असं जयंत पाटील म्हणाले. “दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. (Filmfare awards in gift city Gujarat) आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोत्रावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल?”, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली आहे.

१५ जानेवारी रोजी जियो वर्ल्ड सेंटर येथे फिल्मफेअरकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली. यंदाचा ६९ वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी रोजी रंगणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा होणार आहे. २०२० चा अपवाद वगळता फिल्मफेअर सोहळा दरवर्षी मुंबईत आयोजित केला जातो. मात्र, यंदा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते आता सरकारला धारेवर धरत आहेत. अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असताना फिल्मफेअर पुरस्कार सोहळाही गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

Latest Posts

Don't Miss