Sunday, January 12, 2025

Latest Posts

फडणवीसच BIG BOSS ! भाजपात नव्या चेहऱ्यांना संधी

| TOR News Network |

BJP VidhanSabha Latest News : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या भाजपात देखील मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी देण्यात आली असून विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस हेच बिग बॉस असणार आहेत. (Devendra Fadnavis Will Be Big Boss For Vidhansabha) त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका होणार असून ते नविन चेहऱ्यांनी अधिक संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.(Preference for New Faces from BJP)

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटप आणि भाजप उमेदवार ठरविण्याचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील. (Vidhansabha Elections All rights to Fadnavis) महायुतीत 288 पैकी किमान 150 जागा भाजपला सोडवण्याची अट पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकली आहे.

फडणवीस यांना नवी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षपद किंवा अन्य एखादी केंद्रीय जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत सुकाणू समितीच्या बैठकीत फडणवीस हेच राज्यात पक्षाचे सर्वोच्च नेते असतील, तसेच विधानसभा निवडणुकीत निर्णयाचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच असतील, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी दिली. (Ashish Shelar On Fadnavis for Vidhansabha Election) बैठकीस फडणवीस, शेलार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सह सरचिटणीस शिवप्रकाश, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांना डावललं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात नाराजी असणाऱ्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. भाजपच्या काही विद्यमान आमदारांविषयी नाराजी असल्यास, नवीन उमेदवार चेहरा द्यायचा निर्णय झाला आहे. (New Faces from Bjp in Vidhansabha) जास्त वेळा विजयी झालेले उमेदवार किंवा पहिल्या टर्ममधील आमदार ज्यांच्या विषयी नाराजी असल्यास त्यांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची सूचना दिल्लीकडून मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Latest Posts

Don't Miss