Saturday, January 18, 2025

Latest Posts

उद्धवजी……गेट वेल सून

फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

| TOR News Network | Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नेमकी हीच बाब हेरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली व  शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली.या टीकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावला. (Fadnavis Reaction on Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले राज्यात ज्या घटना घडल्या त्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडल्या आहेत. त्या घटना गंभीर आहेत, त्यांचं गांभीरता मी नाकारत नाही. पण व्यक्तीगत वैमनस्यातून या घटना घडल्याने याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था आणि राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे.(Law And Order in Maharashtra) ज्या दोन तीन घटना आहेत त्यापाठीमागे वयक्तीक कारणे हेवेदावे आहेत. त्यांची भांडणे, व्यवहार आहेत. त्याबाबत आम्ही कडक कारवाई करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केलं.

घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात एका पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असून याची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, विजय वडेट्टीवारांना फार काही माहिती नसतं, ते अशा सनसनाटी गोष्टी बोलत असतता.(Vijay wadettiwar talks unnecessary) कुठल्याही गोष्टीची योग्य प्रकारे होईलच. पण अलिकडच्या काळात गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात गुंडांचा हैदोस – शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे संतापले

सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यात खूनखराबे वाढतील, राज्या मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर बोलताना फडणवीस हसून म्हणाले की, त्यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता माझं ठाम मत झालं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी एवढंच म्हणेल की गेट वेल सून.(Fadnavis says Uddhavji Get Well Soon) मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही आणि एवढंच म्हणेल की गेट वेल सून (लवकर बरे व्हा) असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss