Thursday, January 16, 2025

Latest Posts

वाझेला हाताशी धरुन फडणवीसांची नवी चाल – अनिल देशमुखांचा पलटवार

| TOR News Network |

Anil Deshmukh Latest News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं.  हे सर्व सुरू असतानाच मुंबईचे  निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केल्याने राजकारण तापलं आहे. (Sachin vaze on anil Deshmukh)अशातच सचिन वाझेच्या आरोपांवर आता अनिल देशमुखांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेत याला प्रत्युत्तर दिले आहे. (Anil Deshmukh reply on Sachin vaze Blame )

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत देवेद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. (Anil Deshmukh counterattack on DCM Fadnavis )‘मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने दिलेला जबाब ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवी चाल आहे. (Sachin vaze Fadnavis new move )सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे.  खुद्द उच्च न्यायालयाने या माणसाच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. ही फडणवीसांची नवी चाल  आहे.  दोन हत्येच्या आरोपात वाझे जेलमध्ये आहे. (Anil Deshmukh on Sachin vaze) अशा माणसाला पकडून भाजप माझ्यावर आरोप करायला लावते आहे, असा पलटवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडवीसांवर केले आहेत.

पुढे बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, मला उच्च न्यायालयाने जामीन देतांना सचिन वाझे याच्या बद्दल जे निरीक्षण नोंदविले आहे त्याचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दिसत नाही.(Dcm Fadnavis Did not Study the case file) त्यांनी आधी त्याचा अभ्यास करुन आणि मग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला आरोप करण्यास लावायला पाहिजे होते. मला जामीन देतांना उच्च न्यायालयाने स्पष्ट पणे म्हटले आहे की, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर दोन खुनाचे आरोप आहेत. (Two murder case on vaze) त्याच्या बयाणावर विश्वास ठेवता येणार नाही.असे असतांनाही फडणवीस त्याला हाताशी धरुन माझ्यावर खोटे आरोप करायला लावत असल्याचे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी 100 कोटी वसूली प्रकरणात जे काही घडले, त्याचे सर्व पुरावे आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे.  मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे.(Sachin vaze blame on Anil Deshmukh pa) मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे.  त्यात जयंत पाटीलयांचंही नाव आहे, असा आरोप सचिन वाझेंनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss