Saturday, January 11, 2025

Latest Posts

विधान परिषदेत परत एकदा फडणवीसांची जादू कायम

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) मतदान झालं. या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम आहे.(magic of Fadnavis continues ) यापूर्वी देखील फडणवीसांनी महाविकास आघाडीला धक्का दिला होता हे विशेष.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे 5 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात होते. त्यांना महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांचं आव्हान होतं. महायुतीचे सर्व 9 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत.(Mahayuti Won mlc Election) लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर महायुतीचे मतं फुटणार असं मानलं जात होतं. पण, फडणवीस यांनी त्यांचा पॅटर्न यशस्वी केलाय. (Fadnavis Pattern successful)

यापूर्वी 10 जून 2022 रोजी झालेली राज्यसभा आणि 20 जून 2022 रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला होता. (Fadnavi shock mahavikas aghadi) या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अतिरिक्त मतं घेत विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं.

विधानपरिषदेच्या या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांच्यावरच महायुतीची सर्व जबाबदारी फडणवीसांकडं देण्यात आली होती.  फडणवीसांनी पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची परंपरा कायम राखली आहे. (Fadnavis shock to mahavikas aghadi)या निवडणुकीत फडणवीसांनी भाजपाचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत जिंकून आणले. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांचाही विजय निश्चित केला.

दुसऱ्या फेरीत भाजपाचे समर्थक सदाभाऊ खोत विजयी झाले. त्यामुळे महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या आमदारांना फोडण्यात शरद पवार यशस्वी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण फडणवीसांनी तो अंदाज चुकवला आहे.

महाविकास आघाडीचं मत फुटल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे.(Cross voting by congress mla) आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं हे निकाल महायुतीमधील पक्षांचा उत्साह वाढवणारे आहेत. त्याचबरोबर महायुतीमधील देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

Latest Posts

Don't Miss