Saturday, January 11, 2025

Latest Posts

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू पक्षाला रामराम ठोकणार

| TOR News Network | Devendra Fadnavis Solapur News : एकीकडे भाजप पक्षात नेते आयात करत असताना शरद पवार यांनी फडणवीसांना एक मोठा धक्का दिला आहे. (Sharad pawar shock to fadnavis) सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू पक्षाला रामराम ठोकणार आहे. (Fadnavis faithful leader to left party) सोलापूरमधील मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.(Sanjay Kshirsagar to Join Sharad Pawar NCP) भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.(I got insulted in BJP)

फडणवीसांना मोठा धक्का

संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. (Sanjay Kshirsagar was close to fadnavis) त्यामुळे पक्षातून ते बाहेर पडत असल्याने हा फडणवीस यांना धक्का आहे.(Big shock to fadnavis in solapur) आता संजय क्षीरसागर हे उद्या २४ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.(Kshirsagar to join sharad pawar ncp) स्वत: संजय क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली. संजय क्षीरसागर यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.

या कारणामुळे सोडणार पक्ष

भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली. (Bjp insulted me from last 10 years) त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप सोडण्यापूर्वी मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांना पक्षात आपणास कसा त्रास दिला गेला, त्याचे पुरावे दिले, असे संजय क्षीरसागर यांनी सांगितले. संजय क्षीरसागर लोकसभा निवडणुकी दरम्यान पक्ष सोडत असल्याने भाजपाची अडचण निर्माण होऊ शकते. (In solapur bjp in trouble)

जनतेच्या उपकाराची उतराई कशी करणार

संजय क्षीरसागर म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून मी राजकारणात आहे. राजकारणात असताना जनतेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले. परंतु मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. भाजपाकडून मला आजपर्यंत जनतेसाठी कुठलाच निधी मिळाला नाही. (No fund to me from bjp) यामुळे जनतेच्या उपकाराची उतराई कशी करणार? हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले. त्यांच्या भेटीसाठी मुंबईत तीन-तीन दिवस थांबावे लागले. जिल्ह्यातील राजकारणास कंटाळून क्षीरसागर पक्षातून बाहेर पडत आहेत.

Latest Posts

Don't Miss