Monday, January 13, 2025

Latest Posts

फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती, म्हणून ल्यांनी….

| TOR News Network | Sanjay Raut On Fadnavis Phone Tapping Case : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती. (Devendra Fadanvis Was Afraid Of Arrest) स्वत:ची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.(Sanjay raut on fadnavis) आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला (Fadnavis pressure eknath shinde to break mla) आणि आमदार फोडायला लावले, असा खळबळजनक आरोपही राऊत यांनी केला.

भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. जून 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडीने भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच कारस्थान रचलं होतं. भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याच महाविकास आघाडीच प्लानिंग होतं असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला होता. (Eknath shinde on mahavikas aghadi)

त्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी चोख प्रत्युतर दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.(Fadnavis phonetapping case) अत्यंत बेकायदेशीरपणे, चोरून त्यांनी विरोधकांचे फोन ऐकण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकूमावरून विरोधकांवर पाळत ठेवण्यात आली. त्या प्रकरणाची चौकशी सुरू होती, गुन्हे दाखल झाले.

शिंदेंना अटकेची भीती दाखवली

आणि याप्रकरणी आपल्याला अटक होऊन शिक्षा होईल, या भीतीतून फडणवीस तडतड करू लागले. आपल्याला अटक होईल या भयातून फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणला. शिंदेंना अटकेची भीती दाखवली.(Shinde was afraid due to arrest) स्वत:ची अटक टाळण्यासाठी, बचाव करण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, असा आरोप संजय राऊत यांनी केला.(Shinde broke mahavikas party and break mla)

पुन्हा चौकशी सुरू करणार

केंद्रातलं सरकार 100% बदलतंय. (Central govt to chande 100 %) तुम्ही सत्तेत आल्यावर गुन्हे रद्द केले, चौकश्या रद्द केल्या. आम्ही सत्तेवर आल्यावर पुन्हा एकदा त्या चौकशा पुन्हा सुरू करू, असा इशाराही संजय राऊत यांनी फडवणीस आणि शिंदे यांना दिला.

बघा व्हिडीओ : प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत

Latest Posts

Don't Miss