Saturday, January 11, 2025

Latest Posts

फडणवीस यांची एससी आणि एसटी मतांसाठी प्लॅनिंग व बैठका

| TOR News Network |

DCM Fadnavis Latest News : यंदाच्या विधानसभेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.(Vidhan Sabha Bjp News) जागावाटप, युती गणित, उमेदवारांची निवड यांसह विविध विषयांवर पक्षांतर्गत चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली.(Fadnavis Meeting for vidhan sabha Election) या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असे आदेश दिले आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला. लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता भाजपने विधानसभेसाठी कंबर कसली आहे.(Bjp planning For Vidhansabha) देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच भाजपची एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.(Fadnavis Meeting with Sc And St workers) यावेळी त्यांनी नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

भाजपला लोकसभेत एससी आणि एसटी मतांचा मोठा फटका बसला होता. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह करण्यात आले, असा आरोप सातत्याने पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एससी आणि एसटी या भाजपच्या आघाड्यांसोबत देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा बैठक घेतली. (Fadnavis Late Night Meeting For Vidhansabha) त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश त्यांना दिले.

विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो. त्यामुळे विधानसभेत अशाप्रकारे जर नरेटिव्ह आले, तर आपण त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली.(Fadnavis instruction Ahead of vidhansabha) तसेच विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Latest Posts

Don't Miss