Sunday, January 12, 2025

Latest Posts

तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले मग त्याने पोलिसांवर हल्ला केला कसा ?

| TOR News Network |

Sanjay Raut on Akshay Shinde Encounter :  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter case) याच्या एन्काऊंटर पोलिसांनी केला.यावर आता विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. या एन्काऊंटरवर महाविकास आघाडीचे नेते संशय व्यक्त करित आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे. (Sanjay raut on encounter)

संजय राऊत यांनी एक्स या समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.(Sanjay raut X post on encounter) त्यात दिसून येत आहे की, अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात आहेत. त्यावेळी त्याचे हात बांधलेले असून तोंडावर बुरखा घालण्यात आलेला आहे. यावरून संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे, फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay raut slams cm shinde and dcm fadnavis)

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर, कालचा प्रकार संशयास्पद आहे. कालची हत्या किंवा इन्काँटर कोणाला वाचवण्यासाठी झाला? टॉयलेट साफ करणारा पोरगा कधीपासुन बंदुक चालवू लागला? या प्रकरणात पोलिसांना, सरकारला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपटे यांना वाचवायचा आहे. (Sanjay raut on dcm fadnavis) त्यासाठी त्यांनी मुख्य पुरावा नष्ठ केला आहे. बदलापूरच्या लोकांची मागणी होती. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, फाशी द्या… मंत्र्याला पिटाळून लावले, आधिका-यांना येऊ दिले नाही. तेव्हा फडणवीस म्हणाले कायदा हातात घेऊ नका म्हणून सांगत होते. अक्षय शिंदेचा खटला फास्ट ट्रकवर चालवणार सांगत होते. मग आता हा एन्काऊंटर झाला कसा? मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss