Sunday, January 12, 2025

Latest Posts

महिलेला डोळा मारणे हा विनयभंगच ; मुंबईतील कोर्टाचा निर्णय

| TOR News Network |

Mumbai Mazgaon District Megistrate :  मागील काही दिवसांपासून राज्याबरोबरच देशभरातून वेगवेगळ्या भागांमधून लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या बातम्या समोर येत आहेत. असं असतानाच मुंबईमधील माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने एक महत्तपूर्ण निर्णय दिला आहे. (Mumbai Mazgaon Magistrete Court Decision) महिलेला पाहून डोळा मारणे हा विनयभंगच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.(Eye Wink = sexual Harassment)

सदर प्रकरण 2022 मधील आहे. 5 एप्रिल रोजी 20 वर्षीय तरुणाने एका महिलेचा हात पकडून तिला डोळा मारला होता. हे कृत्य म्हणजे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न करणारं असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. भायखळ्यामधील आरोपीचं नाव मोहम्मद कैफ मोहम्मद शोहराब फरीक असं आहे. डॉकयार्ड रेल्वे स्टेशनसमोरील दुकानामध्ये तो कामाला होता. (Accused working in shop) तक्रार करणाऱ्या महिलेने या दुकानामधून सामान खरेदी केलं. या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आरोपी महिलेच्या घरी गेला होता. सामान घरात ठेवल्यानंतर ग्राहक महिलेने पावती मागितली. त्यावेळस पावती देताना आरोपीने महिलेचा हात पकडला आणि तिला डोळा मारला. महिला जोरात किंकाळली आणि तिने आरडाओरड सुरु केला. आरोपी घाबरुन पळून गेला.

महिलेने पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर भायखळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.(Police Regester case on eye wink) हा खटला तब्बल 2 वर्ष चालला. या प्रकरणामध्ये न्याय दंडाधिकारी आरती कुलकर्णींनी आरोपीला दोषी ठरवलं आहे.

आरोपीचं वय आणि गुन्ह्याचा स्वरुप लक्षात घेत न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्याला कारवासाची शिक्षा न सुनावणात आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. आरोपीने पीडितेला 2 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या महिलेला तरुणाच्या कृत्यामुळे मनस्ताप झाल्याचं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं.

Latest Posts

Don't Miss