Thursday, January 16, 2025

Latest Posts

शिर्डी येथील साईबाबांच्या मूर्ती बद्दल तज्ज्ञांचा खळबळजनक दावा

| TOR News Network | Shirdi Sai Baba Idol Big Claim News : शिर्डी येथील साईबाबांच्या मूर्ती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.साईबाबांच्या मूर्ती बद्दल तज्ञांनी मोठा दावा व्यक्त केला आहे.याप्रकरणी तज्ञ काय म्हणतात, ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊ या.

साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) मूर्तीची झीज होत आहे. काळजी न घेतल्यास भविष्यात मुर्ती गुळगुळीत होण्याची शक्यता देखील मुर्तीतज्ञांनी व्यक्त केली आहे. समाधी मंदिरात साई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 1954 साली करण्यात आली होती. (Shirdi Saibaba Idol From 1954) ही मूर्ती इटालियन मार्बलची आहे. इटालियन मार्बलची ही मूर्ती दिवसेंदिवस झिजत असल्याचा तज्ञांनी दावा केला आहे.

थ्रीडी स्कॅनिंगद्वारे संरक्षित

मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करण्याची गरज असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. मूर्तीची (Sai Baba Idol Erosion) झीज रोखण्यासाठी साई संस्थानने पाऊले उचलणं गरजेचं आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या मूर्तीचा डाटा अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंगद्वारे संरक्षित केला तर पुढच्या पिढ्यांना किमान आज दिसते तशी साईमूर्ती बघता येईल, असं मूर्तीतज्ञ म्हणत आहेत.(Preserve Saibaba Idol By Three D Scanning)

मूर्तीच्या दाढी, हातापायांची नखे, मिशांचे केस यामध्ये आता सध्याच झिज झाली आहे. या मूर्तीची काळजी घेतली नाही, तर भविष्यात ही मूर्ती (Shirdi Sai Baba Idol ) गुळगुळीत होण्याची भीती पंचविसाव्या वर्धापनदिनीच व्यक्त केली गेली होती. त्यानंतर संस्थानने मूर्तीच्या स्नानासाठी अतिगरम पाणी, दही-दुधाचा वापर कमी केला होता.

गरम पाण्यानं ती ठिसूळ होते

मूर्ती इटालियन मार्बलची आहे. मार्बल नैसर्गिकदृष्ट्या थंड असल्यानं गरम पाण्यानं ती ठिसूळ होते. दही-दुधात असलेल्या आम्लाचाही मूर्तीवर विपरीत परिणाम होतो. याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. साईभक्तांसाठी हा फार जिव्हाळ्याचा विषय (Shirdi Saibaba News) आहे.

प्रत्येक मूर्ती किंवा वस्तूचं एक ठराविक आयुष्य असतं. कालांतराने मूर्तीची झीज होते किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुटफूट झाल्यास तिचं सौंदर्य कमी होते. या पार्श्वभूमीवर मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करता येतो. भविष्यात मूर्ती बदलायची ठरली, तर या डाटाचा वापर करून हुबेहूब दिसणारी मूर्ती कोणत्याही बनवता येते.(Shirdi Saibaba Idol Exchange)

Latest Posts

Don't Miss