Saturday, January 11, 2025

Latest Posts

काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना घाम का फुटला : संजय राऊत

Mp Sanjay Raut On Exit Poll 2023 : पाच राज्यांतील निवडणुकीच्या एग्झिट पोलवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले भाजपाने २०१४ पासून काँग्रेसमुक्त भारतची घोषणा दिली. पण काँग्रेसने काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला आहे.चारही राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या एग्झिट पोलबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “भाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली होती. पण त्याच काँग्रेसने आणि काँग्रेसच्या राहुल गांधीसह प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला आहे.(Mp Sanjay Raut Reaction Over 5 States Assembly Election Exit Poll) पंतप्रधान मोदींना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतंय. गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरावं लागतंय.हे काँग्रेसमुक्त भारतचं लक्षण नसून २०२४ ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, याची ही हवा आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की, राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेस पक्षाचं म्हणजेच इंडिया आघाडीचं सरकार बनेल आणि मिझोराममध्येही प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस सत्तेत असेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

Latest Posts

Don't Miss