Sunday, January 12, 2025

Latest Posts

एन्काऊंटर स्पेशलिस्टची पत्नी विधानसभेच्या रिंगणात

| TOR News Network |

Pradeep Sharma Wife Latest News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे.अशात आता  एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. (Pradeep Sharma Wife swikruti sharma in Politics )स्वीकृती शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्या विधानसभा लढण्याच्या तयारीसाठी सज्ज झाल्या आहेत. (Swikruti sharma to contest vidhansabha)

स्वीकृती शर्मा यांचे पती प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते.(Encounter specialist pradeep sharma) अँटिलिया प्रकरणी प्रदीप शर्मा यांचे नाव चर्चेत आले. प्रदीप शर्मा यांच्यावर २००६ मध्ये कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

आता प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा राजकीय इनिंगसाठी सज्ज झाल्या आहेत. स्वीकृती शर्मा यांनी शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश केला.(Swikruti sharma join shinde sena) यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. स्वीकृती शर्मा यांनी 50 गाड्या, 25 बसेस आणि 100 हून जास्त बाईक्स घेत शक्तीप्रदर्शन केले.

स्वीकृती शर्मा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर आता त्या आगामी विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचे बोललं जात आहे.(Swikruti sharma to contest from andhari east) मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Latest Posts

Don't Miss