Saturday, January 11, 2025

Latest Posts

नाही तर काही जण फाशी घेतील…

| TOR News Network | Jaranage Patil Latest News Today : मागासवर्ग आयोगाने टक्केवारी कशी काढली मला महित नाही. त्यांच्या मनानेच 10 टक्के आरक्षण देण्याची शिफारस त्यांनी केली का? हे देखील मला माहीत नाही. हा आयोग याच आंदोलनामुळे तयार झाला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे त्यासाठीच हे आंदोलन उभं राहिलं आहे. ज्याला जे आरक्षण घ्यायचं ते घेतील. सरकरने दिलेलं आरक्षण रद्द झालं तर काही जण फाशी घेतील, (Some people will hang themselves) अशा शब्दांत जरांगे पाटलांनी मागासवर्ग आयोगाच्या टक्केवारीवरून प्रतिक्रिया दिली आहे.(Manoj Jarange Patil On Backward Class Commission)

मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. 20 किंवा 21 तारखेनंतर जरांगे आपल्या आंदोलनाची दिशा ठरवणारेत. सगेसोयऱ्यांबाबतच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, (The movement will not withdraw)असा इशारा आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी दिला आहे.

२० किंवा २१ तारखेपर्यंत अंमलबजावणी करणे सरकराला गरजेचे आहे. त्यांनी तसे न केल्यास पश्चाताप म्हणजे काय? याची व्यख्या सरकारला करावी लागेल, इतक्या आक्रमकतेने आंदोलन होणार आहे. (Now Protest will Continue with more aggression) आम्ही दिलेल्या व्याख्येसह सगेसोयऱ्यांबाबतच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी आजच्या १० वी १२ वीच्या परीक्षांचा उल्लेख केला. मराठा समाजाला विनंती आहे १०वी १२ वीची परीक्षा आहे. त्यामूळे शांततेत आंदोलन करा. विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यावं त्यात कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थी हे देश आणि राज्याचे भवितव्य आहे. त्यांना अडचण यायला नको याची काळजी घ्या, असं आवाहन जरांगे पाटलांनी आंदोलकांना केलं आहे.

Latest Posts

Don't Miss