Saturday, January 11, 2025

Latest Posts

नवा धमाका : एकनाथ शिंदे 2013 साली काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते

Theonlinereporter.com – May 8, 2024 

Eknath Shinde Latest News : दोन वर्षांपूर्वी  एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. आज एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हा सर्वांना माहित असलेला इतिहास आहे. पण त्याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा प्रयत्न केला होता, (Eknath Shinde was To Left shivsena in 2013) असा आरोप महाविकास आघाडीचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी केला आहे. (Mva Candidate Rajan Vichare on Cm Shinde) 

राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (Serious charges On Eknath Shinde) ‘एकनाथ शिंदे हे 2013 सालीच फुटणार होते’, असा दावा राजन विचारे यांनी केलाय. “एकनाथ शिंदे 2013 सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते.(Eknath shinde was likely to join congress in 2013) स्वत:सह मिळून पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते” असा दावा राजन विचारे यांनी केला. “आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार? असं चार आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं” असं राजन विचारे म्हणाले.

“एकनाथ शिंदे यांना शिवसेना संपवायची होती. (Shinde wants to finish shivsena) तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात, याला फोडं, त्याला फोडं, कुठला पक्ष सोडलात सांगा?” अशा शब्दात राजन विचारे यांनी हल्ला चढवला. काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा राजन विचारे यांच्या आरोपांना दुजोरा दिला. “2013 साली एकनाथ शिंदे पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मी असं ऐकलं होतं” असं विजय वेडट्टीवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss