Saturday, January 11, 2025

Latest Posts

वायकरांच्या ठिकाणी जर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का?

| TOR News Network |

Eknath Shinde Latest News : “ईव्हीएमचा घोटाळा केला असता तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेही जिंकले असते. वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे. मेरिटवर झालेला विजय आहे. वायकरांच्या ठिकाणी जर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. (Eknath Shinde On EVM Hack) ते शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वरळी डोम येथे कार्यक्रमात बोलत होते.

“उबाठा हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोला आणि रडा. रडेगण असं नाव त्यांना दिलं पाहिजे. सारखा रडीचा डाव. जिंकलो जिंकलो ढोल पिटताय. पण कुणाच्या जीवावर.(Eknath Shinde On Lok Sabha Win) शिवसेनेचा मतदार तुमच्यासोबत राहिला का विचार करा. मुंबईत तुमच्या पेक्षा सव्वा दोन लाख जास्त मते आम्हाला मिळाली”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. (Eknath Shinde on Loksabha votes)

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर घणाघात केला. (Eknath Shinde Slams Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणि ठाकरे गटाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरुन निशाणा साधला. विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.(Eknath Shinde On aaditya thackeray) पण या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला केवळ साडेसहा हजारांचं लीड मिळालं. त्यामुळे आता आदित्य ठाकरे भेंडीबाजारातून लढणार का? अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता केली.

“वरळीत तुम्हाला कमी मतदान मिळालं. जेमतेम सहा हजाराची लीड. 50 हजाराचं लीड मिळणार असा दावा करत होता. आता कसे लढणार? तुम्हाला भेंडीबाजारत लढावं लागणार. मतदारसंघात नाही पत, माझं नाव गणपत. अशी अवस्था झालीय आहे”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.

Latest Posts

Don't Miss