Thursday, January 16, 2025

Latest Posts

मुख्यमंत्री म्हणाले आपल्या जवळ फक्त 60 दिवस शिल्लक 

शिवसंकल्प अभियानाचा रोड मॅप तयार

Eknath Shinde Latest News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारणही तापत जात आहे. भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेनेसह इतर पक्ष ही आपली रणनीती आखत आहे. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले आपल्या जवळ फक्त 60 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या राज्यव्यापी झंझावाती दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.शिवसंकल्प अभियानाद्वारे शिवसेना 6 जानेवारीपासून राज्यभरात 16 लोकसभा मतदारसंघात मेळावे घेणार आहे.(Cm Eknath Shinde on Loksabha Election 2024)

अभियानाच्या वेळापत्रकानुसार एकनाथ शिंदे यांची पहिली सभा येत्या 6 जानेवारीला यवतमाळ वाशिममध्ये होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे हेही राज्यव्यापी दौरा करणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.(Cm Eknath Shinde Shiv Sankalp Rally)

आपल्याला 48 जागा लढून महायुती म्हणून जिंकायच्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असेही स्पष्ट केले. आपण आपल्या सर्व जागा ताकदीने लढवूया, जिंकूया. आपली महायुती विजयी करुया.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित (28 डिसेंबर) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत राज्यव्यापी दौरा, त्याचे नियोजन आणि तयारी याविषयी चर्चा करण्यात आली. येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या हातात फक्त 60 दिवस उरले आहेत, तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Latest Posts

Don't Miss