Saturday, January 18, 2025

Latest Posts

आपल्या सुनेविरुद्ध एकनाथ खडसे लोकसभेच्या मैदानात

Eknath Khadse Loksabha News : आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे मैदानात उतरले आहेत. खडसे यांनी स्वतः लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता ते सून रक्षा खडसेंविरोधात लढणार आहेत. .(Eknath Khadse will Fight against Raksha Khadse) या मतदारसंघात सध्या रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरतील अशी चर्चा आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशात एनडीए आणि इंडिया अशा दोन महाआघाड्यांमध्ये या निवडणुकीत चुरस रंगणार आहे. राज्यात देखील या निवडणुकीसाठी महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. जागा वाटप, उमेदवारांची निवड आणि कोण कोणत्या मतदारसंघातून लढेल यावर खलबतं सुरू झाली आहेत.

या सर्व घडामोडींदरम्यान जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू असही निवडणूक आपण लढायला तयार असल्याचं अगदी ठासून सांगितलंय.

पक्ष जो आदेश देईल त्याचं पालन करू – रक्षा खडसे

रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय. मोदींचा प्रभाव पाहता त्या हॅट्रिक करायच्या मूडमध्ये आहेत. सासरे खडसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर तिकडे रक्षा खडसेही भाजपकडून तिसऱ्यांदा संधी मिळेल या आशेवर आहेत. परंतु येत्या निवडणुकीत रक्षा खडसेंचा पत्ता कापला जाईल आणि त्यांच्या ऐवजी गिरीश महाजनांना उमेदवारी दिली जाईल अशी देखील चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. परंतु रक्षा खडसे यांनी पक्ष जो आदेश देईल त्याचं पालन करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Latest Posts

Don't Miss