Saturday, January 11, 2025

Latest Posts

नाथाभाऊंचं ठरलं : भाजप प्रवेशाबद्दल घेतला मोठा निर्णय

| TOR News Network |

Eknath Khadse Latest News :  ज्या वेळेस मी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्या कालखंडामध्ये माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती.(Eknath Khadse on joining BJP) दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत मी असताना जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला.  यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घातला. या घटनेला 5 ते 6  महिने होऊनही भाजपनं माझा प्रवेश झाल्याचं घोषित केलं नाही. अजून मी वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही. (eknath Khadse on Bjp joining announcement) त्यामुळे यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आपण फुली मारलीय असा मोठा निर्णय ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घेतला. ते एका वृत्तवहिणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी मला  राज्यपालपदाची ऑफर  दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.(Eknath Khadse on governors post)  फडणवीसांनी मनापासून प्रयत्न करेन असं सांगितलं होतं.  फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse on Devendra Fadnavis)  दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं  देखील एकनाथ खडसे म्हणालेत.

एकनाथ खडसे म्हणाले, मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. (Eknath Khadse on devendra fadnavis) तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो.(Devendra fadnavis offer me governors post) त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. मी म्हटलो राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे.  पुढे काय झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते. साधारण ही गोष्ट 2019 सालातील आहे.

मी प्रवेश घेतो असं कधी म्हणालो नव्हतो. मला प्रवेश घ्या असे म्हणाले होते. त्यानंतर मी शरद पवार आणि जयंत पाटलांशी चर्चा करुन गेलो होतो. 40 वर्षे भाजपचे काम केले.इतके वर्ष काम केले, पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इतकं सगळ करून भाजपमध्ये मला प्रवेश द्या ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे.

Latest Posts

Don't Miss