Saturday, January 18, 2025

Latest Posts

मी परत येईल की नाही याची खात्री नव्हती

हृदयविकाराच्या झटक्यानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

Eknath Khadse Latest News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाले असून ते बऱ्याच दिवसानंतर आता घरी परतले आहेत. त्यांनी घरी येताच पहिला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले राज्यातील तमाम जनतेसोबतच मुक्ताईच्या आशीर्वादाने मी परत आलो त्याचा आनंद आहे. (Ncp Leader Eknath Khadse First Reaction After Recovering From Massive Heart Attack)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यावर घरी परतल्यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी या झटक्यातून लवकर सावरलो आणि मुक्ताईच्या आशीर्वादाने परत आलो त्याचा आनंद आहे. एवढ्या मोठ्या संकटातून वाचल्यानंतर एकनाथ खडसे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद होते म्हणून मी हृदयविकाराच्या झटक्यातून बरा झालो आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त केले. तर मी जनतेच्या सेवेसाठी सिद्ध आहे. वर्षभरापासून जनतेसाठी संघर्ष करत आलोय, या संघर्षातून वेगवेगळ्या भूमिका मी बजावल्या आहेत, असे म्हणत पुन्हा नव्या उत्साहाने जनतेची काम करणार असल्याचा शब्द खडसे यांनी जनतेला दिला. यासह खडसे यांनी असेही म्हटले की, आता मला नवा जन्म मिळाल्यासारखं वाटतंय. तर अनेक कार्यकर्त्यांनी माझी भेट घेतली. या भेटीतून माझा उत्साह त्यांनी द्वीगुणित केल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले हृदयविकाराच्या झटक्यानंतर मी परत येईल की नाही याची खात्री नव्हती. मात्र मी मुक्ताईच्या आशीर्वादाने परत आलो त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

Latest Posts

Don't Miss