Sunday, January 12, 2025

Latest Posts

तर गिरीश महाजनांना चौकत जोड्याने मारेन

एकनाथ खडसे संतापले : काय आहे प्रकरण

Ncp Leader Eknath Khadse On Girish Mahajan: जळगांवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद हा नवा नाही. या दोघांत आरोप प्रत्यारोप सतत सुरुच असतात. मात्र यंदा एकनाथ खडसे चांगलेच संतापले.यावेळी त्यांनी महजनांना थेट भर चौकात जोडे मारण्याची भाषा केली आहे.

 काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. मात्र एकनाथ खडसे यांच्या या आजारपणावर गिरीश महाजन यांनी शंका उपस्थित केली. त्यावर आता एकनाथ खडसेंचा व्हिडीओ समोर आला आहे. गिरीश महाजन यांना जोड्याने मारेन असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. (Eknath Khadse says I Will Hit Girish Mahajan With Shoes On Road)

खडसे म्हणाले गिरीश महाजन यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्यांनी माझ्या आजारावर शंका उपस्थित केली आहे. मी हे सर्व सहानुभूती मिळावी म्हणून केलं आहे असे वक्तव्य त्यांनी केले.मात्र यावर खडसे चांगलेच संतापले आहेत.खडसे म्हणाले महाजनांचे वय होत आहे. त्यामुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी स्त्रीरोगांकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे त्यांचं हृदयरोगांकडे कमी लक्ष गेलं. माझं हृदय बंद पडलं होतं. बंद पडलेलं हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टरांना करावे लागले. ७० ते ८० लाख लोकांमधून एखादा अशा अवस्थेतून परत येतो. तसा मी परत आलो. कारण संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते. पण आता गिरीश महाजन यांना हे कसं कळणार?” असा सवाल खडसे यांनी या व्हिडीओत केला आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीश महाजन यांनी जे चाळे केले त्यामुळे त्यांनी हकालपट्टी झाली.आता माझं गिरीश महाजन यांना आव्हान आहे, माझ्या सगळ्या कागदपत्रांची खात्री करावी. माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. जर त्यांना हे सिध्द करता आलं की माझा आजार खोटा आहे, सहानुभूती मिळावी म्हणून मी हे केलं आहे तर गिरीश महाजन यांनी भर चौकात मला जोडे मारावेत. पण माझी कागदपत्रं खरी आहेत हे सिद्ध झालं तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीश महाजन माझं आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील. जर चुकीचं असेल तर मी जोडे खायला तयार आहे.” असं म्हणत त्यांनी आव्हान दिलं आहे.

Latest Posts

Don't Miss