Sunday, January 12, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला ईडीचे समन्स

| TOR News Network | ED Summons Amol Kirtikar : एकीकडे लोकसभेचे उमेदवार जाहीर होत आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी नामांकन दाखल करण्याची धावपळ सुरु आहे. असे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढले आहे. ठाकरे गटाचे नेते व लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे.(ED Summons to shivsena loks abha candidate Amol Kirtikar) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं या समन्समध्ये नमूद करण्यात आलंय. (Amol kirtikar in trouble)

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं ईडीच्या कारवायाचं सत्र देखील वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ईडीने अटक केली होती. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना देखील ईडीने समन्स बजावलंय. त्यामुळे विरोधक आक्रमक होऊन सत्ताधारी भाजपला धारेवर धरण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यांची या भागात मोठी ताकद आहे. अशातच त्यांना ईडीचे समन्स आल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

१६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप

राज्यात कोरोनाचं संकट असताना लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे पॅकेट पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. यात १६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता. या प्रकरणात माजी मंत्री अनिल परब, माजी मंत्री रविंद्र वायकर यांची देखील चौकशी झाली होती. तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सूरज चव्हाण यांना अटकही करण्यात आली होती. आता या प्रकरणात अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आलं आहे.

Latest Posts

Don't Miss