Friday, January 17, 2025

Latest Posts

नेते मंडळींचे झाल्यावर व्यापाऱ्यावर ईडीच्या धाडी पडणार

प्रकाश अंबेडकर म्हणाल भजपला सत्तेवर येऊ देऊ नका

| TOR News Network | Prakash Ambedkar On ED : सध्या देशात मोठ मोठ्या आणि विविध पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी टाकल्या जात आहे. त्या सोबतच सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या उद्योजकांवरही ईडीच्या धाडी पडत आहे. यानंतर आता पुढील टप्प्यात ईडी व्यापाऱ्यांना घेरणार आहे. (Eds next target is Traders) त्यामुळे भाजपाला थांबवणे तुमच्या हातात आहे. भाजपला मतदान करु नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. (Prakash Ambedkar to Traders)

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशातील व्यापाऱ्यांना भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. “मी व्यापाऱ्यांना सजग करतो, चेतावणी देतो की आता राजकीय नेत्यांवर धाडी घालण्याचा नंबर लागला आहे. (Prakash Ambedkar warns traders) त्यांचा नंबर संपला आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बसवलं तर पुढचा नंबर तुमचा, ईडी तुमच्या बोकांडी बसेल. राजकीय नेते, उद्योगपतींची लाईन झाली की तुमची लाईन आहे. वेळीच सावध व्हा. जे राजकीय नेत्यांचं झालं ते तुमचं होऊ द्यायचं नसेल तर भजपला सत्तेवर येऊ देऊ नका,Dont Vote Bjp) ही दक्षता बाळगा. देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची. ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर धाडी घाला”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजप-आरएसएसचं सरकार धमकावतं

“अशोक चव्हाण यांच्याशी बोलायचं निरोप येतो आणि अशोक चव्हाण गायब. कोणाशी बोलायचं? निवडणुकपर्यंत अनेक जण भाजपात जातील. जाण्यापासून वाचा.(Be Alert From BJP) भाजप-आरएसएसचं सरकार धमकावतं.(BJP-RSS government threatens) जायचं असेल तर खुल्या दिलाने जा खुल्या मनाने जा. जाताना भाजपला लोळवल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प करा. भाजप आरएसएसचे काही म्हणतात आमचे दिवस वाईट आहेत. सत्ता आहे, खुर्च्या आहेत पण दुसरेच पळवत आहेत. सभा मोठ्या होऊ द्या, ते इशाऱ्यात म्हणतात आगे आगे देखो होता है क्या? जे गेले त्यांची आगीतून निघून फुफाट्यात गेले काय? अशी त्यांची परिस्थीती होण्याची शंका आहे. मीच उपाशी राहिलो, अशी कार्यकर्त्यांची परिस्थीती आहे”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

२४ लाख कुटुंब देश सोडून गेले

भाजपवाले 400 जागा निवडून आणू म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दीडशे जागा आणून दाखवाव्यात. भीतीचं, दमदाटीचं वातावरण याची सुरूवात झालीय. २०१४ ते २०२४ या कालावधीत किती भारतीय कुटुंब नागरिकत्व सोडून गेले, हे माहीत असले पाहिजे. आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहे काय, हे मोदींनी सांगावे, असे आव्हान आहे. २४ लाख कुटुंब देश सोडून गेले. ते हिंदू आहेत”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

चोराने पोलिसांसोबत हात मिळवणी केली

“काँग्रेवाले नालायक आहेत. त्यांच्याजागी मी असतो तर भाजप आणि आरएसएसला तुम्ही खोटारडे आहात म्हणून माफी मागायला लावली असती. लोकांनी सत्ता दिली की चोरी झालेले पैसे येतील आणि जनतेला मिळेल, असं सांगत होते. पण असं दिसत आहे की चोराने पोलिसांसोबत हात मिळवणी केली अशी शंका आहे. जे खोटारडे आहे यांच्या हातात पुन्हा पाच वर्ष देऊ नका”, असं आवाहन आंबेडकरांनी केलं.

वंचितचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विघान 

तर ठोकल्याशिवाय राहणार नाही

आता कुणीही कुणाचं वर्चस्व स्वीकारायला तयार नाहीय. बरोबरीने वागा. हाताच्या बाहेर परिस्थिती गेली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी सुद्धा म्हणतो की अश्रू धुरा सोडायच्यात तर सोडा. पण यापुढे गेले तर सोडणार नाहीय आणि तुला पाठवणाऱ्याला सुद्धा सोडणार नाही, असं शेतकरी म्हणतोय. या देशात अराजकता उंबरठ्यावर आली आहे. आयाराम गायारामच्या भरवश्यावर कारभार देशात सुरु आहे. राजकारणातलं पाणी आज पूर्ण गढूळ झालं आहे. यामुळे त्यात नवीन पाणी टाकून फायदा नाहीय. यामुळे पाणीच बदलावं लागेल. यामुळे यावेळी जाती, नातेवाईक यांना प्राधान्य दिल तर दिल्लीत दिसणारी आराजकता गल्लीत पोहचेल”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Latest Posts

Don't Miss