Saturday, January 11, 2025

Latest Posts

मंत्र्याच्या पीएकडे सापडला पैशांचा ढीग

| TOR News Network | Jharkhand Latest Newsदेशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ईडीने मंत्र्याच्या खासगी सचिवाकडे काम करणाऱ्या एका नोकराच्या घरावर भल्यापहाटे छापा टाकला. (ED Raid On ministers Pa Servant) यावेळी कोट्यवधींचं घबाड आढळून आलं. पैशांचा ढीग पाहून ईडी अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. नोटा मोजण्यासाठी मशीनी मागवण्यात आल्या आहेत. 

या नोटा नेमक्या कुठून आल्या? याची चौकशी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीने सोमवारी पहाटेच्या सुमारास झारखंडमधील रांची शहरात अचानक छापेमारी केली. (Ed raid in jharkhand) झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या पीएच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराच्या घरावर ईडीने धाड टाकली.

यावेळी जवळपास २५ कोटी रुपयांचं घबाड ईडी अधिकाऱ्यांना सापडलं. (25 crore Notes Seized by ed) नोटांचा ढीग पाहून ईडी अधिकारीही चक्रावले. पैसे मोजण्यासाठी बँकेतून कर्मचारी आणि मशीन मागवण्यात आल्या आहेत.(Machines called to count the money) सध्या ईडीचे अधिकारी नोकराची कसून चौकशी केली आहे. (ED Started Inquiry of servant)

दरम्यान, हे पैसे मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचे असल्याचं नोकराने सांगितलं आहे.(Sanjeev Lal Pa to Minister Alamgir Alam) निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

Latest Posts

Don't Miss