Thursday, January 16, 2025

Latest Posts

मोठी अपडेट : आज विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होणार

| TOR News Network |

Vidhansabha Election Latest News :आगामी  विधानसभा निवडणूकांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. (Vidhansabha Election 2024 Date) यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. (Election Comission Press Today) त्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. (Vidhansabha term come to end on 26 november) हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये बराच काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. त्यात जम्मूमध्ये 43 विधानसभा जागा तर काश्मीरमधील 47 विधानसभा जागा आहेत. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या. न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

Latest Posts

Don't Miss