Saturday, January 18, 2025

Latest Posts

एका चुकीमुळे फरार मनोरमा खेडकर पकडल्या गेल्या

| TOR News Network |

Manorama Khedkar Latest News : IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Case Register on Manorama Khedkar) मात्र त्यानंतर त्या फरार झाल्या. अखेर त्यांना रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. पोलिस अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता, कोणताही संपर्क साधता येत नव्हता.(Manorama khedkar’s Mobile switch off ) अटक टाळण्यासाठी त्या फरार झाल्या आणि लपून बसल्या.मात्र त्यांनी केलेल्या एक चूकीमुळे त्या पोलिसांच्या हाती लागल्या. (absconding Manorama Khedkar mistake Found them)

मनोरमा खेडकर महाडमधील हिरकणवाडी येथे एसल्याची माहिती पोलीसांना मिळाली. व सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना कोर्टात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Manorama khedkar in police custody)मनोरमा खेडकर फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना झाली होती. ट्रॅप लावत महाडमधील एका लॉजमधून त्यांना ताब्यात घेतलं.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा अपघातानंतर फरार झाला होता. त्याला शोधतानाही पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. मात्र त्याच्या मित्राच्या एका चुकीमुळे तो पकडला गेला होता.(mihir Shah Caught by his friends mistake) असंच काहीसं मनोरमा खेडकर यांच्या बाबतीतही घडलं. त्यांच्या एका चुकीमुळे पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कळलां आणि त्यांनी पटापट सूत्र हलवत मनोरमा यांना अटक केली.

बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. पोलिसांना चकमा देत त्या इकडेतिकडे लपत होत्या. अखेर त्या महाड येथील हिरकरणीवाडीमधील पार्वती निवास हॉटेलमध्ये जाऊन लपल्या, तेथे राहण्यासाठी त्यांनी खोट्या नावाने रूम बुक केली होती. (Booked hotel on others name) कॅब ड्रायव्हर दादासाहेब ढाकणे यांच्या आधार कार्डचा मनोरमा खेडकर यांनी गैरवापर केला. आणि ड्रायव्हरच्या आईच्या आधार कार्डवरील नावाचा वापर करून त्यांनी इंदूबाई ढाकणे या नावाने हिरकणीवाडीत रूम बुक केली. पोलिस त्यांचा सर्वत्र शोध घेत होते, पण नाव बदलून रहात असल्याने त्यांना शोधणं कठीण गेलं

मात्र मनोरमा यांना त्यांची एक चूक नडली. लॉजमध्ये लपलेल्या असतानाच 17 तारखेला रात्री अकरा वाजताच्या सुमारास मनोरमा खेडकर यांनी त्यांचा फोन सुरू केला होता.(Manorama khedkar switch on her cell) मनोरमा यांना शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या फोन सर्वेलन्सवर ठेवला होता . (Manorama Khedkar cell on surveillance)त्या दिवशी मनोरमा यांनी फोनसुरू केला आणि पोलिसांना त्याचं लोकेशन समजलं. त्यांनी तातडीने सूत्र हलवली आणि घटनास्थळी धाव घेत त्या लॉजवरून पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं, अशी माहिती समोर आली आहे. एका चुकीमुळे त्या पकडल्या गेल्या.

Latest Posts

Don't Miss