Saturday, January 11, 2025

Latest Posts

पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट ; कार गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचा दावा

| TOR News Network |

Pune Porsche Car Accident Case Latest Update : पुणे प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांनी अपघातावेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचा दावा केला. (Driver was driving car while car Accident) त्यानंतर या प्रकरणात आरोपी आणि त्याच्या वडिलांकडून पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे.(New Twist in pure car accident) अशातच आरोपींच्या दाव्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र हलवली असून अपघाती गाडीचा संपूर्ण मार्ग तपासला आहे. (Police verifying cctv footage)

19 मे रोजी दोन निरपराध इंजिनिअर्सना चिरडणारी महागडी पोर्शे गाडी अग्रवाल यांच्या घरातून किती वाजता बाहेर पडली, याचा देखील तपास पोलिसांनी केला. पोलिसांनी अग्रवालांच्या घरापासून कोसी, तिथून ब्लॅक आणि तिथून अपघात स्थळापर्यंतच्या संपूर्ण मार्गाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. (Police checked cctv footage) फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी पूर्ण झाली आहे. महागडी गाडी अग्रवाल यांच्या कंपनीच्या नावावर आहे. गाडी सध्या येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा ताबा मागताना पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, अल्पवयीन आरोपीनं कार चालवायची मागणी केली. त्यानंतर ड्रायव्हरनं त्याच्या मालकाला (अल्पवयीन मुलाच्या वडिलांना) फोन केला. त्यावेळी धनिकपुत्राच्या बापानं माझ्या मुलाला गाडी चालवू देत, असं सांगितलं. मालकाच्या सांगण्यावरुनच मुलाला गाडी चालवू दिली, असं ड्रायव्हरनं सांगितलं.(Car was given as per his dads instruction) याप्रकरणी ड्रायव्हरला साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर करता येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आरोपी अल्पवयीन व्यक्तीने दावा केला आहे की, अपघाताच्या वेळी त्याच्या कुटुंबाचा ड्रायव्हर कार चालवत होता. (Accused claim driver was running car) अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांनीही या दाव्याचं समर्थन केलं आहे.

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे. आज पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील सहा आरोपींची पोलीस कोठडी पोलीस न्यायालयाकडे मागणार आहेत. विशाल अग्रवाल याचा संभाजीनग मधून जप्त केलेला मोबाईलही फॉरेन्सिक पथकाकडे सोपवण्यात आला आहे. गाडीत बसलेल्या 3 पैकी 2 मित्रांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मित्रांनी आणि आरोपीच्या कुटुंबीयांनी जबाब दिला आहे.

Latest Posts

Don't Miss