| TOR News Network |
Devendra Fadnavis Latest News : लोकसभेत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election 2024) जोरदार तयारी सुरू केली. लोकसभेत विरोधकांनी खोटं नॅरेटीव्ह सेट केलं होतं. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांना उत्तर देण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा सल्ला दिला. (Fadnavis To Bjp Worker) पण मैदानात उतरताना ‘हिटविकेट’ होऊ नका, असं देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. (Dont Give Hit Wicket says DCM Fadnavis)
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिलं होतं. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला होता. (Fadnavis On Reservation) अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाची सीमा वाढवल्याने या देशात संविधानानं दिलेलं आरक्षण सामान्य लोकांना मिळत आहे,” असं म्हणत आरक्षणा मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला डिवचलं.(Fadnavis Slams Congress on reservation)
“राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक समाज एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. काही नेत्यांना वाटते हे समाज जर एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ, ते (विरोधक) केवळ राजकारण करु पाहत आहेत. सरकार येते जाते, पण समाज एकसंध राहिला पाहिजे. समाजातील दुफळी लवकर दूर होणार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे,”(Fadnavis on Maratha Reservation) असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाबाबतची भूमिका मांडली.
“शरद पवार यांनी का आरक्षण दिले नाही.(Fadnavis on Sharad Pawar) मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे कोण म्हटले हे सर्व समाजाला माहिती आहे. आम्ही आरक्षण दिले आणि ते टिकवलेसुद्धा. पण मविआचे सरकार आले आणि त्यांनी ते टिकवले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यावर आरक्षण दिले. जरांगे यांच्या आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय आहे? दुटप्पी भूमिका घेऊ नका. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्सासाठी तुमचे समर्थन आहे का?” असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला आहे.(Fadnavis Questioned to Mahavikas Aghadi on Reservation) “दोन्ही समाजाला अंधारात तरी ठेवू नका. समाजाला न्याय मिळवून देण्सासाठी आमची शिव्या खाण्याची तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही,” असा इशारा फडणवीसांनी दिला.
पुण्यातील बालेवाडी येथे भाजपाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. (Pune Bjp Mahamelava) यावेळी फडणवीस म्हणाले की, “आपल्यात अनेक लोक असे आहेत जे विरोधकांना उत्तरच देत नाहीत. आज तुम्हाला मी परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. मैदानात उतरा, पण अट एकच आहे की ‘हिटविकेट’ व्हायचं नाही.(Dont Give hit wicket) काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की, चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात.”