Thursday, January 16, 2025

Latest Posts

मुख्यमंत्रीपदावरुन महाविकास आघाडीत बिघाडी

| TOR News Network |

Mahavikas Aghadi Latest News :  आगामी विधानसभा निवडणुका आता जवळ येत आहेत. सर्व पक्ष जातीने तयारीला लागले आहेत. अशात सर्व प्रमुख पक्ष मुख्यमंत्री पदासाठी आपला दावा असल्याचे सांगत आहेत. आघाडी आणि युती यांनी अजूनही आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र मुख्यमंत्रीपदावर दावे केले जात आहेत. ( All Party Clam For Cm Seat) महायुतीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीतही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा याची चर्चासुरू झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे विधान केले आहे.(Sanjay Raut On Next Cm) शिवाय काँग्रेसकडे कोणता मुख्यमंत्रीपदा करता चेहरा आहे ते सांगावे असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. (sanjay Raut On Congress Cm Face) यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून घमासान होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचीच री पुन्हा एकदा ओढली आहे. 2019 मध्येही मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे संजय राऊत म्हणाले. जर काँग्रेस आणि  नाना पटोले यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा कुठला चेहरा असेल तर त्यांनी सांगावे, असे आवाहन राऊत यांनी दिला. (Sanjay Raut On Nana Patole) नाना पटोल माझे मित्र आहेत. महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे ते मी सांगतोय, असं सांगत राऊत यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले आहे. असं सांगत मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Nana Patole Reaction on Sanjay Raut) लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल असे नाना पटोले म्हणाले. शिवाय मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. निवडणुकीला आम्ही आघाडी म्हणूनच सामोरे जाणार आहोत. जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या शंभर जागाही निवडून येणार नाहीत असा दावा पटोले यांनी केला.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (balasaheb Thorat On Sanjay Raut) प्रतिक्रिया देताना त्यांनी संजय राऊत यांना चिमटे काढले आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात आणि आमचे कार्यकर्ते काय म्हणतात याला काही अर्थ नाही. ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील त्यावेळी त्यावर निर्णय होईल. काँग्रेसकडे चेहरे पण आहेत आणि ताकद ही आहे. ही वस्तूस्थिती राऊतांनी स्विकारली पाहीजे असे थोरात म्हणाले.

Latest Posts

Don't Miss