Friday, January 17, 2025

Latest Posts

वळसे पाटीलांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

Theonlinereporter.com – May 13, 2024 

Sharad Pawar Latest News : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजवायला सुरुवात केली आहे. या दरम्यान अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मात्र मोठं विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. (Dilip Walse patil on Sharad Pawar) शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. (Sympathy Towards Sharad Pawar)ऐन मतदानाच्या दिवशीच दिलीप वळसे पाटील यांनी हे मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दिलीप वळसे पाटील हे आजारी आहेत.मात्र ते मतदानाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Walse patil to media )आजारी असल्याने मला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला आहे. यावेळी तब्येतीच्या कारणाने सक्रिय प्रचारात सहभागी होता आलं नाही याची खंत आहे, असं सांगतानाच लोकसभा निवडणूक देशाच्या मुद्द्यांवर लढली जाते. पण यंदा पहिल्यांदाच याने काय म्हटले आणि त्याने काय म्हटले यावर ही निवडणूक लढवली जात आहे. (walse patil on loksabha) शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. (Walse patil sympathy towards sharad pawar)

दिलीप वळसे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. घरात अंधारात लाईट सुरू करायला जात असताना ते पाय घसरून पडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर काही दिवस उपचार करण्यात आले. पण त्यांची प्रकृती अधिकच खालावली. सध्या दिलीप वळसे पाटील घरी आहेत. पण त्यांच्या प्रकृतीला म्हणावा तसा आराम मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आलं नाही.

Latest Posts

Don't Miss