Sunday, January 12, 2025

Latest Posts

दिघे साहेबांच्या प्रतिमेचा शिंदेनी गैरवापर केला ; धर्मवीर-2 सिनेमा पाहू नका

| TOR News Network |

Dharmveer 2 Movie Latest News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर-2 हा सिनेमा आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा सिनेमा अत्यंत बकवास आणि बोगस असल्याचं म्हटलं आहे. (Sanjay Raut on Dharmveer 2 Movie) या सिनेमातील सर्व गोष्टी काल्पनिक असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. आता तर दिघे यांच्या कुटुंबातील व्यक्तीने म्हणजे दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीच या सिनेमावर टीका केली आहे. (Kedar Dighe criticised Dharmveer 2 Movie) केदार दिघे नुसतेच टीका करून थांबले नाहीत तर त्यांनी हा सिनेमा पाहू नका, असं आवाहनच शिवसैनिकांना केलं आहे. (Kedar Dighe appeal not to see Dharmveer 2 Movie)

केदार दिघे यांनी ट्विट करून या सिनेमावर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वर्गीय दिघे साहेबांच्या आडून एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला चॅलेंज करत आहेत. त्यासाठीच धर्मवीर-2 हा चित्रपट काढला गेला आहे असे वाटते. धर्मवीरांच्या जीवनापेक्षा गद्दारी पचवण्यासाठी खोट्या गोष्टी यात आहेत. या चित्रपटाचे नाव गद्दारी नंबर 1 असायला हवं होतं!, असा हल्ला केदार दिघे यांनी चढवला आहे. (Kedar Dighe on Dharmveer Movie)

एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात दिघे साहेब येतात, असं काल्पनिक चित्र रंगून स्वतःच्या फायद्यासाठी धर्मवीर 2 चित्रपट काढला गेला. दिघे साहेब स्वप्नात येऊन शिवसेना पक्ष चोर असं कधीच सांगणार नाहीत. या चित्रपटात दिघे साहेबांच्या प्रतिमेचा गैरवापर शिंदेनी केला आहे. ठाणेकर त्यांना माफ करणार नाहीत, असं सांगतानाच जेव्हापासून यांनी गद्दारी केली आहे, तेव्हापासून दिघे साहेब आमच्या स्वप्नात येऊन सांगतात… शिंदे गटाला ठाण्यातून नेस्तनाबूत करा…आमच्याकडे धनसंपत्तीची कमतरता आहे. परंतु ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिक सोबत आहेत!, असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss