Saturday, January 18, 2025

Latest Posts

मी लिहीलेल्या डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकाचे लवकरच प्रकाशन – अनिल देशमुख

| TOR News Network |

Anil Deshmukh Latest News : माझ्या विरुध्द षडयंत्र रचुन मला खोटया आरोपामध्ये १४ महिने तुरुंगात ठेवण्यात आले. न्यायालयीन लढाई लढुन मी तुरुंगाच्या बाहेर आलो. मी  तुरुंगात असतांना माझ्या विरुध्द कसे षडयंत्र रचण्यात आले यावर  पुस्तक लिहीले. तुरुंगात असतांना अनेक वृत्तपत्राचे कात्रणे व अनेक संदर्भ गोळा केले. तुरुंगातुन बाहेर आल्यावर या पुस्तकाला अंतीम स्वरुप दिले असून हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये छापण्यात आले आहे. (Anil Deshmukh Book News) लवकरच मी लिहीलेल्या “डायरी ऑफ होम मिनिस्टर” या पुस्तकाचे  प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (Diary Of Home Minister Book to Release soon)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना मी गृहमंत्री होतो. माझ्यावर खोटे आरोप करुन मला तुरुंगात टाकण्यात आले. तब्बल १४ महिने एका खोटया आरोपात मी तुरुंगात होतो. माझ्याविरोधात कोणी व कसे षडयंत्र रचले व माझ्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कसा प्रयत्न झाला, मला व माझ्या परिवाराला कसा त्रास देण्यात आला, हे जाणुन घेण्याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला आहे. मी तुरुंगात असतांना हे पुस्तक लिहण्यास सुरुवात केली. (Anil Deshmukh on his book) मला अडकविण्यासाठी कोणी व कसे षडयंत्र रचले. यानंतर माझ्या माध्यमातुन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करीत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे कसे व कोणाच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात आले याची संपुर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगीतले.

मी मधल्या काळात या बदल काही गोष्टींचा खुलासा केला होता. तेव्हा अनेकांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही या गोष्टींचा खुलासा आताच का करीत आहात पहिले का नाही केलात. तुरुंगात लिहीलेल्या पुस्तकाला मी बाहेर आल्यावर अंतीम रुप देण्यासाठी वेळ लागला. खरतर मी पुस्तकाच्या माध्यमातुनच हे सर्व खुलासे करणार होतो. परंतु काही चुकीची माहिती ही जनतेसमोर येत असल्यामुळे काही खुलासे करावे लागले. मी लिहलेल्या पुस्तकातुन माझ्या विरुध्द रचण्यात आलेले षडयंत्र, माझ्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कसे प्रयत्न करण्यात आले आणि यासाठी मी नकार दिल्याने मला खोटया गुन्हात अडकवुन कसे १४ महिने तुरुंगात ठेवण्यात आले या संपूर्ण षडयंत्रा बद्दलची माहीती लवकरच मी लिहीलेल्या “ डायरी ऑफ होम मिनिस्टर” या पुस्तकाच्या माध्यमातुन समोर येणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगीतले.

Latest Posts

Don't Miss