Monday, November 18, 2024

Latest Posts

फिल्मी स्टाइलमध्ये कार्गो शिप हायजॅक

हेलिकॉप्टरमधून उतरताच थेट फायरिंग

Cargo Ship hijack: तुम्ही अनेकदा चित्रपटात जहाज हायजॅक होताना पाहिले असेल.अगदी तसाच खराखुरा प्रकार हूती दहशतवाद्यांनी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गॅलेक्सी लीडर शिप या ब्रिटिश कंपनीच्या नावावर आहे. रेड सी मध्ये मार्गक्रमण करणाऱ्या त्या जहाजावर हूती दहशतवादी अचानक हेलिकॉप्टरमधून आले व उतरताच थेच फायरिंग सुरु केली. (Houthis Release Video Showing Armed Men Hijacking Israeli Linked Cargo Ship In Red Sea)

जहाजाच्या हायजॅकिंगचा हा व्हिडिओ लाल सागरातील आहे. रेड सी मध्ये मार्गक्रमण करणाऱ्या ब्रिटिश कंपनीच्या नावावर हे गॅलेक्सी लीडरचं जहाज आहे. हूती दहशतवादी हेलिकॉप्टरमधून जहाजावर उतरले. त्यांनी ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा देत फायरिंग सुरु केली. जहाजावर उतरल्यानंतर पुढे जात केबिनमध्ये गेले. तिथे असलेल्या स्टाफला त्यांनी सरेंडर करायला सांगितलं. या जहाजावर 25 जण होते. हूती दहशतवाद्यांनी या हायजॅकिंगचा व्हिडिओ हूती टीव्ही चॅनल अल मशीराहवर रिलीज केलाय. हायजॅक केलेलं जहाज इस्रायलशी संबंधित आहे, असं या हूती दहशतवाद्यांचा दावा आहे. इस्रायलने हूती दहशतवाद्यांचा हा दावा खोडून काढला आहे.हे जहाज जापानमधून ऑपरेट होतं. सौदी अरेबियाच्या जेद्दामधील दक्षिण-पश्चिमेला लाल सागरात असताना हे जहाज हायजॅक करण्यात आलं. सॅटेलाइट ट्रॅकिंग डेटावरुन ही माहिती मिळालीय. येमेनच्या होदेइदा शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर असताना हे जहाज हायजॅक करण्यात आलं.हूती दहशतवाद्यांनी म्हटलय की, ही तर सुरुवात आहे. इस्रायलला आता आणखी अशा हल्ल्यांसाठी तयार राहिलं पाहिजे. हे हायजॅक केलेलं जहाज इस्रायलशी संबंधित आहे, असा हूती दहशतवाद्यांचा दावा आहे.

Latest Posts

Don't Miss