Saturday, January 11, 2025

Latest Posts

माढ्यात थोरल्या पवारांनी भाकरी फिरवली : मोहिते पाटीलांचा शनिवारी शरद पवार गटात प्रवेश

| TOR News Network | Mohite Patil Latest News : माढा लोकसभा मतदार संघासाठी भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मोठी फिल्डींग लावली होती.तसेच ते गेल्या वर्षभरापासून माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले होते. तसा त्यांनी प्रसार माध्यमातून प्रचार आणि प्रसारही केला होता. भाजपकडे अतिशय ताकदीने आपणास उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. (Madha Lok sabha Seat News) परंतु भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक-निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.आता ते शनिवारी (ता. १३) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. (Dhairyasheel Mohite Patil on way to Sharad Pawar Ncp) मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

भाजपने उमेदवारी न दिल्याने मोहिते-पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाली. यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशान फडकवले. त्यानंतर धैर्यशील आणि मोहिते-पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. प्रत्येक गावातील आपल्या समर्थकांना तसेच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपारिक विरोधक रामराजे नाईक-निंबाळकर, कै. चिमणराव कदम यांचे चिरंजीव तसेच माण तालुक्यातील प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे आदींना भेटून आपल्याविषयी मते जाणून घेतली.

हे सर्व घडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपणाकडे खेचून घेण्याचे निश्चित केले होते. ते भाजपच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊन होते. दुसरीकडे मोहिते-पाटील परिवाराची भाजपच्या श्रेष्ठींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बंड शमवण्याचा प्रयत्न केला.(BJP leaders tried to understand the family)

परंतु याला यश आले नाही. त्यामुळे खरेच मोहिते-पाटील बंड करणार का? याची उत्सुकता लागून राहिली होती. मोहिते पाटील कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत धैयशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाली असून अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये १३ एप्रिल रोजी मोहिते-पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा १३ एप्रिल रोजी वाढदिवस असून त्याचदिवशी अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील मैदानावर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे समजते.(Mohite patil will join NCP In Akluj)

रणजितसिंह पाटीलांकडे लक्ष

एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झालेले असताना भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील भाजपसोबत राहणार की आपल्या कुटुंबाबरोबर राष्ट्रवादीत जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.(Ranjitsingh mohite patil) रणजितसिंह यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. मात्र, येणाऱ्या आठवड्यात त्यांची भूमिकाही स्पष्ट होईल.

Latest Posts

Don't Miss