Saturday, January 11, 2025

Latest Posts

सकाळी 9 वाजता एक पोपटलाल येतो आणि बडबड करून जातो

Theonlinereporter.com – May 17, 2024 

Devendra Fadnavis Latest News : हे युद्ध मताच्या रुपानं जिंकायचं आहे. दुसरीकडं राहुल गांधी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 24 पक्षाची खिचडी असल्याचं ते बोलले. तर खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता सकाळी 9 वाजता एक पोपटलाल येतो आणि बडबड करून जातो.(Devendra Fadnavis Slams Sanjay Raut) त्यांना विचारलं तर आमच्याकडं अनेक उमेदवार असल्याचं ते म्हणतात. हे काय संगीत खुर्चीचा खेळ करून दरवर्षी एक पंतप्रधान करणार का? असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.ते महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Mahayuti candidate Bharati Pawar) यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. (DCm Fadnavis Public Rally)

या देशाला सुरक्षित ठेवेल असा पंतप्रधान निवडायचा आहे. (Fadnavis On Pm) आमच्या गाडीत सर्व जाती धर्माच्या लोकांना बसण्यासाठी जागा आहे, तर दुसरीकडं फक्त इंजिन आहे. त्यांच्या इंजिनमध्ये गांधी, ठाकरे, पवार यांच्यासाठीच जागा आहे. (Fadnavis on Mahavikas aghadi) 10 वर्षात मोदी यांनी चमत्कार केला. 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, लोकांना पक्की घरं दिलीत, शौचालय दिलं. 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जात आहे. भविष्यात मोदी हे सोलर योजना आणणार आहेत.(Fadnavis On Solar Scheme) त्या माध्यमातून 300 युनिट मोफत मिळणार आहे. कांद्यासारखा प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढू असंही फडणवीस म्हणाले.(Fadnavis on onion issue)

कांद्याचा, सोयाबीनचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची गरज आहे.(Fadnavis on farmer sucide) फडणवीस नेहमी केंद्रात प्रयत्न करतात. विरोधकाच्या भुलथापाना बळी पडू नका, यांच्यातर्फे मुस्लिमांना भडकविण्याचं काम केलं जात आहे. (Fadnavis on muslim) 10 वर्षात किती दंगली झाल्या. मुस्लिमांना भीती दाखवून भाजपाच्या जवळ येऊ देत नाही, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याची ग्वाही मी देते. विरोधक संविधान बदलण्याची भाषा करतात.(Devendra Fadnavis on samvidhan) मात्र, अशी भावना मोदी यांची नाही. संघर्ष कोणाच्या वाट्याला येत नाही, मुंडे साहेबांसोबत माझ्या वाट्याला देखील संघर्ष आला. (Fadnavis on gopinath munde) पण मागे हटवायचं नाही. आता भारती पवार यांना खासदार करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

मोठ्या शहरात नसेल असं स्टेडियम तयार होत आहे. येथे उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही भारती पवार यांना निवडून द्या, आम्ही तुमच्यासासाठी बेअरर चेक आहोत.(Fadnavis appeal to choose Bharti pawar) निवडणूक होताच तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करून देईन असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले की, त्यांच्याकडून निधी आणून नाशिक, नगर, जिल्ह्यातील पाणी समस्या मार्गी लावण्याचं देखील प्रपोजल तयार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

Latest Posts

Don't Miss