Thursday, January 16, 2025

Latest Posts

व्ही आर डाऊन बट नॉट आउट – फडणवीस

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : भाजपाने मुंबईत ‘विजय संकल्प मेळावा’ आयोजित केला होता.(Bjp Vijay Sankalp Melava) यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी या मेळाव्यात बोलताना लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नेते, आमदार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.(Devendra Fadnavis To Party Worker) तसंच कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ‘फेक नेरेटिव्हचे बारा’ वाजवायचे आहेत.(Fadnavis on teachers constituency) मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा आपलाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय.तसेच लोकसभेत झालेली पीछेहाट वर बोलताना व्ही आर डाऊन बट नॉट आउट असे वक्तव्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “किरण शेलार यांच्यासारखा संघटनेतून तयार झालेला युवा उमेदवार आपल्याला भेटलाय. मुंबईच्या चाळीमध्ये जन्मलेला पक्का मुंबईकर म्हणजे किरण शेलार! (Fadnavis ok kiran shelar) आजही त्यांचे आई वडील मुंबईच्या बीडीडी चाळीत राहतात. निवडणुकीच्या निकालात शिकून पुढं जायचं असतं. त्यामध्ये पुढं जाताना पहिली संधी कुठली तर पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे. यापूर्वी मधु देवळेकर मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार होते. आपण हा मतदार संघ आपल्या मित्र पक्षांना दिला. परंतु आता जे आपलं आहे, ते आपल्याकडं परत आणण्याची सुवर्णसंधी आहे. पदवीधर निवडणूक प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची नोंदणी असते. आपण नोंदणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्यामुळं नोंदणीची पहिली लढाई आपण जिंकलोय. आता फक्त नोंदणीकृत झालेला मतदार पोलिंग स्टेशनपर्यंत जायला हवा. ही निवडणूक मनावर आणि डोक्यावरदेखील घ्यायची आहे. फेक नेरेटिव्हचे बारा वाजवायचे असतील तर हा विजय संपादित करणं फार गरजेचं आहे. अनेक वर्षानंतर मुंबई पदवीधर संघाचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.(Teachers constituency win is must for Mumbai bjp)

पुढं ते म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं जास्त भेटली. पण महाविकास आघाडीला मतदान मुंबईकर आणि मराठी माणसानं केलं नाही. तसंच आमच्या उत्तर भारतीयांनीसुद्धा त्यांना मतदान केलेलं नाही. (Devendra fadnavis on lok sabha voters) त्यांना नेमकं कुठून मतदान भेटलं हे आपण नीट बघितलं पाहिजे. गेले चार महिने त्यांनी ‘इथं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू-भगिनो मातांनो’ हे बोलणं सोडलं होतं. त्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं. केवळ त्यांच्या मतांनी ते जिंकले आहेत. परंतु हे विधानसभेत आणि महानगरपालिकेत चालणार नाही. मुंबईकरांचा विश्वास केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे.

“देशभरात 76 जागा आणि मुंबईत 13 जागा आपण फार कमी मतांनी हरलो. (Fadnavis on lok sabha)आपण सोशल मीडियावर तेवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही. काही लोक डमरू वाजवत आहेत. त्या सर्वांना मी सांगू इच्छितो फेक नेरेटिव्ह एकदा चालतो, वारंवार चालत नाही. आम्ही बाउन्स बॅक करू. महाराष्ट्रामध्ये व्ही आर डाऊन बट नॉट आउट (We are down but not out) (कमी झालो, पण बाद झालो नाही).आपण विधानसभेतही जास्त जागा घेऊ. महानगरपालिकेची निवडणूक कधी होऊ दे. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं आहे की फेक नेरेटिव्हमध्येसुद्धा आम्ही आमचा गड राखू शकतो. आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. शेवटी निवडणुकीमध्ये आपण जिंकणारच आहोत, या कारणाने कमी काम करणं अशी भावना तयार होणे घातक आहे. अशात काही चमको नेते तयार होणे सुद्धा त्याहून घातक आहे.”आता जिंकेपर्यंत हार नाहीत, फुलं नाहीत. सर्वांना काम करायचंय. त्यानंतर जोरात जल्लोष करू”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss